Pimpri Chinchwad Crime: रस्त्यावर थांबला म्हणून तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल

By रोशन मोरे | Updated: November 7, 2023 15:48 IST2023-11-07T15:47:36+5:302023-11-07T15:48:41+5:30

पोलिसांनी अज्ञात चार संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे....

Youth killed for stopping on road, case registered against four Pimpri Chinchwad Crime | Pimpri Chinchwad Crime: रस्त्यावर थांबला म्हणून तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime: रस्त्यावर थांबला म्हणून तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : रस्त्यावर वाट पाहत थांबलेला असताना झालेल्या वादातून चौघांतून मिळून तरुणाचा खून केला. ही घटना रविवारी (दि. ५) तळेगाव दाभाडे येथे घडली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव कृष्णा कैलास शेळके (वय २०, रा.राऊतवाडी, पवनानगर, मावळ) असे आहे. या प्रकरणी १७ वर्षीय मुलाने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चार संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र करण लगड, कृष्णा शेळके हे सिनेमा पाहण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. कृष्णा हा एक जणाला भेटण्याकरिता निलया सोसायटी जवळील अंधारात थांबला होता. त्यावेळी चार अनओळखी इसम तेथे आले. त्यांनी कृष्णा याला इथे का थांबला आहेस, असे विचारणा केली. तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीमध्ये संशयितांनी चाकू सारख्या धारधार शस्त्राने कृष्णा याच्या छातीवर तसेच पाठीवर मारले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Youth killed for stopping on road, case registered against four Pimpri Chinchwad Crime