भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 19:38 IST2019-05-12T19:37:18+5:302019-05-12T19:38:32+5:30
भरधाव वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली. सुनील भागवत शिंदे (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय भागवत शिंदे (वय ३४, रा. म्हेत्रे वस्ती, चिखली, मूळ-मिरगवन, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोरेवस्तीतील अंगणवाडी कॉलनीतून सुनील शिंदे हे जात असताना भरधाव वेगात आलेल्या (एमएच ०३, सी.व्ही. १९९९) या क्रमांकाच्या वाहनाने शिंदे यांना धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.