रेल्वेच्या धडकेत अज्ञात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 15:19 IST2018-09-04T15:17:57+5:302018-09-04T15:19:09+5:30

मध्य रेल्वेच्या डाउन ट्रकवर मंगळवार ( दि ४ ) रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात रेल्वेची धडक बसल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

youth dies in train accident | रेल्वेच्या धडकेत अज्ञात युवकाचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत अज्ञात युवकाचा मृत्यू

कामशेत : मध्य रेल्वेच्या डाउन ट्रकवर मंगळवार ( दि ४ ) रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात रेल्वेची धडक बसल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

              लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहराच्या हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅक वर किलोमीटर न १४४/३४ ते १४४/ ५० दरम्यान गाडीने धडक दिल्यामुळे एका अज्ञात तरुणाचा मृत्यु झाला आहे. मृत व्यक्ती  अंगाने सडपातळ, सावल्या रंगाचा असून त्याने अंगात निळ्या रंगाचे बनियन, काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, लाल रंगाचे सँडल घातलेले असून त्याने वय अंदाजे ३२ ते ३५ असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या मृताची ओळख अद्याप पटली नाही. याप्रकरणी पुढील तपास लोहमार्ग पोलीस हवालदार एस. बी. तोडमल करत आहेत .

Web Title: youth dies in train accident