Pimpri Chinchwad: पिंपरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 20:25 IST2022-08-08T20:25:18+5:302022-08-08T20:25:33+5:30
तरुण अविवाहित असून त्याला दारूचे व्यसन होते

Pimpri Chinchwad: पिंपरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे सोमवारी (दि. ८) पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुमित विश्वास पवार (वय ३८, रा. विठ्ठलवाडी आकुर्डी), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित हा त्याच्या आई-वडिलांसोबत रहात होता. अविवाहित असलेल्या सुमित याला दारूचे व्यसन होते. सोमवारी त्याने पहाटे राहत्या घरात पंख्याला गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सुमित याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.