व्हिडिओ शुटींग काढत असल्याबाबत विचारणा केल्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 19:35 IST2019-05-05T19:34:10+5:302019-05-05T19:35:49+5:30

व्हिडिओ शुटींग का काढत आहात, अशी विचारणा केली असता बाप-लेकांनी मिळून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली.

youth beaten up for asking purpose of video shooting | व्हिडिओ शुटींग काढत असल्याबाबत विचारणा केल्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

व्हिडिओ शुटींग काढत असल्याबाबत विचारणा केल्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

पिंपरी : व्हिडिओ शुटींग का काढत आहात, अशी विचारणा केली असता बाप-लेकांनी मिळून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शनिवारी मोशीतील बोरहाडेवाडी येथे घडली. 

गोविंद करसण पटेल (वय ४८, रा. द्वारका विश्व सोसायटीसमोर, इंद्रायणीनगर, भोसरी) व यश पटेल असे गुन्हा दाखल केलेल्या बाप-लेकांचे नाव आहे. याप्रकरणी अय्याज अतिकुल रहेमान चौधरी (वय २९, रा. महिंद्रा अंथिया, बिल्डिंग   ए ४, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोशीतील बोरहाडेवाडी येथील गट नंबर २५६ येथे चौधरी हे त्यांचा ट्रक काढत होते. त्यावेळी काहीही कारण नसताना आरोपींनी त्यांची व्हिडीओ शुटींग केली. याबाबत चौधरी यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी चौधरी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर गोविंद पटेल याने लाकडी दांडक्याने तर यश पटेल याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: youth beaten up for asking purpose of video shooting