तू मला आवडतेस म्हणत महिलेचा विनयभंग; पिंपरीत तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:02 IST2021-06-26T18:02:19+5:302021-06-26T18:02:46+5:30

गेल्या दीड वर्षापासून आरोपी हा फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत आहे.

Youth arrested in pimpri due to molestation of a women | तू मला आवडतेस म्हणत महिलेचा विनयभंग; पिंपरीत तरुणाला अटक

तू मला आवडतेस म्हणत महिलेचा विनयभंग; पिंपरीत तरुणाला अटक

पिंपरी : महिलेचा सतत पाठलाग केला. तू मला आवडतेस, असे म्हणून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पिंपरी येथील एका हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि. २५) दुपारी ही घटना घडली.

नितीन बाबुराव थेटे (वय २८, रा. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. २६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षापासून आरोपी थिटे हा फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत आहे. तू मला आवडतेस, तू माझ्यासोबत बोलत जा, मी तुझ्यासाठी झुरत आहे, असे सारखे वारंवार बोलून फिर्यादी यांना त्रास देत आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी या पिंपरीतील एका रुग्णालयात असताना आरोपीने पुन्हा तेच बोलून पीडित महिलेचा विनयभंग केला. माझ्या मनात असे काहीही नाही, असे फिर्यादीने स्पष्टपणे आरोपीला सांगितले. यामुळे संतापलेल्या आरोपीने फिर्यादीच्या गालावर चापट मारली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.

Web Title: Youth arrested in pimpri due to molestation of a women