Pune | आकुर्डीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; सापळा रचून केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 17:14 IST2023-01-12T17:12:16+5:302023-01-12T17:14:50+5:30

गणेश तलावाजळ निगडी पोलिसांची कारवाई...

Youth arrested for possession of pistol in Akurdi pune latest crime news | Pune | आकुर्डीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; सापळा रचून केली कारवाई

Pune | आकुर्डीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; सापळा रचून केली कारवाई

पिंपरी : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक केली. आकुर्डी येथे गणेश तलावाजळ बुधवारी (दि. ११) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. इम्तियाज उर्फ इमरान रज्जाक मुल्ला (वय २४, रा. इस्लामपूर, ता. कळवा, जि. सांगली, सध्या रा. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी केशव चेपटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील गणेश तलावाजवळ एका दुकानासमोर एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून इम्तियाज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी २५ हजारांचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ६०० रुपयांचे एक जिवंत काडतूस जप्त केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Youth arrested for possession of pistol in Akurdi pune latest crime news