सांगवीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 21:06 IST2018-07-31T21:06:00+5:302018-07-31T21:06:58+5:30

शिवाजीनगर ते वाकड या मुख्य रस्त्यावरील सांगवी फाट्याजवळील सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ एकाचा मृतदेह आढळला.

young man murdered by weapon at sangvi | सांगवीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

सांगवीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

पिंपरी : सांगवी फाटा येथे धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.३१जुलैै)पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. अजित नंदकुमार भुईया (वय ३५, रा. कारोलोया, ठाणा बसिया, झारखंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमितकुमार शिंदे (वय ३८, रा. पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे शिवाजीनगर ते वाकड या मुख्य रस्त्यावरील सांगवी फाट्याजवळील सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ एकाचा मृतदेह आढळला. याबाबत सांगवी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भुईया हे रक्ताच्या थारोळ्यात होते. त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार केल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. भुईया हे फिर्यादी शिंदे यांच्या कंपनीत कामाला होते. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सांगवी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: young man murdered by weapon at sangvi