ठरलेले लग्न किरकोळ कारणावरून मोडल्याने तरुणाची आत्महत्या;भोसरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 16:09 IST2020-09-07T16:08:47+5:302020-09-07T16:09:11+5:30
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तरुणीवर गुन्हा दाखल

ठरलेले लग्न किरकोळ कारणावरून मोडल्याने तरुणाची आत्महत्या;भोसरीतील घटना
पिंपरी : लग्न ठरलेले असताना तरुणीने किरकोळ कारणावरून लग्नास नकार दिला. त्यामुळे ठरलेले लग्न मोडले. तसेच तरुणीने मानसिक त्रास दिला. त्यामुळे तरुणाने आत्महत्या केली. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे हा प्रकार घडला.
भरत कृष्णा तळपे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील कृष्णा केशव तळपे (वय ५५, रा. घंगाळदरे, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ६) फिर्याद दिली आहे. त्यानुसार उषा बाळू सरोगदे (वय २३, रा. खडकुंबे, ता. जुन्नर) हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा भरत आणि आरोपी उषा यांचे लग्न ठरले होते. मात्र किरकोळ कारणावरून आरोपी हिने लग्नास नकार दिला. तसेच २१ ते ३१ जुलै २०२० दरम्यान आरोपी हिने मानसिक त्रास देऊन भरत याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामळे भरत याने ३१ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.