तरुणाने मैत्री करत अल्पवयीन मुलीला घरी नेले; त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 13:06 IST2021-08-16T13:06:00+5:302021-08-16T13:06:09+5:30

तरुणावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

The young man befriends and takes the minor girl home; She was then sexually assaulted | तरुणाने मैत्री करत अल्पवयीन मुलीला घरी नेले; त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

तरुणाने मैत्री करत अल्पवयीन मुलीला घरी नेले; त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

पिंपरी : अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखली येथे शुक्रवारी सकाळी ११ ते शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

रोहन (रा. वडगाव बुद्रुक, पुणे, पुर्ण नाव माहीत नाही), याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १४) फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने अल्पवयीन मुलीशी सुमारे आठ महिन्यांपासून मैत्री करून सलगी केली. मुलीला शुक्रवारी पुण्यातील सारसबाग येथे बोलावून घेतले. त्यानंतर तिला स्वतःबरोबर राहत्या घरी घेऊन गेला. तिच्या बालीशपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The young man befriends and takes the minor girl home; She was then sexually assaulted