शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 20:54 IST

अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पिंपरी : अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विजय दत्तात्रय पवार (वय २७, रा. पिंपळे सौदागर, मुळ रा. प्रसाद नगर, ता. जि. परभणी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मयत मुलीच्या आईने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत १६ वर्षीय मुली सोबत काढलेले फोटो आरोपीने स्वतःच्या फेसबूक व इंस्टाग्रामवर पोस्ट करून इतर मित्रांना टॅग केला‌. तिची बोलण्याची इच्छा नसतानाही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून आरोपी तिला भेटण्यास बोलावत होता. आरोपीने फिर्यादीच्या मुलीची बदनामी केली. त्या बदनामीमुळेच फिर्यादीच्या मुलीने सोमवारी (दि. १२) दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरात छताच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या आईने तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक