Pune | "तू माझ्यासोबत फिरायला चल..." पिंपरीत महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 18:34 IST2022-12-12T18:33:30+5:302022-12-12T18:34:41+5:30
पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे...

Pune | "तू माझ्यासोबत फिरायला चल..." पिंपरीत महिलेचा विनयभंग
पिंपरी : ऑफिसमध्ये काम करत असताना महिलेला बोलावून तू एकदा तरी माझ्यासोबत फिरायला चल असे म्हणत, महिलेला कामावर काढून टाकण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केला. ही घटना मागील दीड वर्षांपासून ते सात डिसेंबर २०२२ या कालावधीत पिंपरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने रविवारी (दि.११) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या ठिकाणी आरोपी याने फिर्यादीला ऑफिसमध्ये बोलावून घेतले. हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने फिर्यादीशी गैरवर्तन केले. तसेच हात पकडून तू एकदा तरी माझ्या बरोबर फिरायला चल असे म्हटले. फिर्यादीने त्याला विरोध केला असता तिला कामावरून काढून टाकण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.