शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात 'वायसीएम' ठरले गर्भवतींसाठी वरदान! २५५ कोरोनाग्रस्त महिलांची यशस्वी प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 13:05 IST

३० टक्के महिलांचे सिझर, नॉर्मलचे प्रमाण अधिक

तेजस टवलारकर-  पिंपरी : मार्च ते सप्टेंबर या सात महिन्यांच्या कोरोनाच्या काळात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात १३२९ महिलांची प्रसूती झाली आहे. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत १०७४ संशयित महिलांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यातील २५५ महिलांना कोरोनाची लागण झाली होती. या २५५ महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. प्रसूती झालेल्या महिलांपैकी ३० टक्के महिलांची प्रसूती सिझरने  झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात वायसीएम रुग्णालय गर्भवती महिलांना वरदान ठरले आहे.       वायसीएम मध्ये जन्मलेल्या नवजात बाळांपैकी दोन बाळांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा संसर्ग सरू झाल्यापासून वायसीएम रुग्णालय हे कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. परंतु याही परिस्थितीत गर्भवती महिलांना वायसीएम रुग्णालयाचा आधार मिळाला आहे.        मार्च महिन्यात वायसीएम रुग्णालयामध्ये ७५० महिलांची महिलांची प्रसूती झाली. परंतु मार्च महिन्यात एकही महिलेला कोरोनाची लागण झाली नाही. मे महिन्यात एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. या महिन्यात ५० महिलांची प्रसूती झाली. त्यातील ४९ महिलांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात १३३ महिलांची प्रसूती झाली. त्यातील सात महिलांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले. प्रत्यक्षात १२६ महिलांना कोरोनाची लागण झाली. सप्टेंबर महिन्यात १७३ महिलांची प्रसूती झाली त्यातील ८५ महिलांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले. त्यातील ८८ महिलांना कोरोनाची लागण झाली. या सर्व महिलांची सुखरुप प्रसूती झाली, असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.-- कोरोनाच्या सात महिन्यांच्या काळात २५५ महिलांना कोरोनाची लागण झाली होती. सर्व महिलांवर योग्य उपचार करण्यात आले. वायसीएमच्या प्रसूती विभागाच्या आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने चांगले काम झाले. कोरोनाच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून उपचार करण्यात आले. ३० टक्के महिलांचे सिझर करण्यात आले आहे.  डॉ. महेश असाळकर, प्रसूती विभाग वायसीएम---  मार्च ते सप्टेंबर या सात महिन्यांची आकडेवारी        मार्च       प्रसूती       संशयित       पॉझिटिव्ह                      ७५०           ७५०                  ०       एप्रिल     ९४            ९४                     ०       मे           ५०             ४९                   १      जून         ४६            ३५                   ११     जुलै          ८३            ५४                  २९   ऑगस्ट     १३३           ७                    १२६    सप्टेंबर    १७३           ८५                  ८८

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpregnant womanगर्भवती महिलाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल