सोमाटणेमध्ये पैशांच्या वादातून कामगाराच्या हाताला घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:20 IST2022-03-26T17:19:06+5:302022-03-26T17:20:32+5:30

रात्री साडेबाराच्या घडली घटना

workers hand was bitten by a dispute over money crime news | सोमाटणेमध्ये पैशांच्या वादातून कामगाराच्या हाताला घेतला चावा

सोमाटणेमध्ये पैशांच्या वादातून कामगाराच्या हाताला घेतला चावा

पिंपरी : घर बांधकामाच्या पैंशाच्या कारणावरून झालेल्या वादातून कामगारासह त्याच्या मालकाला मारहाण केली. तसेच कामगाराच्या दंडावर चावा घेतला. सोमाटणे (ता. मावळ) येथे सोमवारी (दि. २१) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 

कुंजुमाॅन बेबी (वय ४२, रा. शिरगाव रोड, सोमाटणे, ता. मावळ) आणि त्यांचा कामगार अतुल कैलास सोनुले, अशी दुखापत झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील कुंजुमाॅन बेबी यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २५) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पूनम प्रदीप वाढे (रा. देहूरोड), सचिन बालघरे व दोन इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घर बांधकामाच्या पैशांच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांचा वाद झाला. पूनम वाढे यांच्या घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा कामगार अतुल कैलास सोनुले या दोघांना लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने दुखापत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच दमदाटीही केली. फिर्यादीचे कामगार अतुल यांना उजव्या हाताच्या दंडावर चावा घेतला. मेडिकल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: workers hand was bitten by a dispute over money crime news