पिंपरीत 19 व्या मजल्यावर पडून कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 19:28 IST2019-07-11T19:26:36+5:302019-07-11T19:28:37+5:30
19 व्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. प्लास्टरचे काम सुरु असताना क्रेन काेसळल्याने ही घटना घडली.

पिंपरीत 19 व्या मजल्यावर पडून कामगाराचा मृत्यू
पिंपरी : 19 व्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरीमध्ये घडली आहे. राजकुमार अशाेक घाेसले (वय 24) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तर बाबुराव यादव आणि करण यादव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाड्याच्या इमारतीचे काम सुरु आहे. राजकुमार आणि इतर दाेन कामगार हे क्रेनवर उभे राहून इमारतीच्या 19 व्या मजल्यावर प्लास्टरचे काम करत हाेते. त्यावेळी अचानक क्रेनचे ब्रेक निकामी झाल्याने कामगार खाली काेसळले. यात राजकुमार हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राजकुमार आणि दाेन कामगारांनी सुरक्षेची सर्व काळजी घेतली हाेती. सेफ्टी बेल्ट वापरुनच ते काम करत हाेते.
जखमी कामगारांवर सध्या उपचार सुरु आहेत. राजकुमार हा मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी आहे. पिंपरीमध्ये ताे कामासाठी आला हाेता. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये भिंत पडून कामगारांचे मृत्यू झालेले असताना पुन्हा एकदा कामगाराला आपले प्राण गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.