महिलांची मंगळसूत्र पळविणारा अट्टल चोरटा गजाआड , ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 16:42 IST2019-06-10T16:39:52+5:302019-06-10T16:42:18+5:30
महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र पळून नेणा-या अट्टल चोरट्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

महिलांची मंगळसूत्र पळविणारा अट्टल चोरटा गजाआड , ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
वडगाव मावळ : महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र पळून नेणा-या अट्टल चोरट्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्या कडून ४ लाख रुपये किंमतीची मंगळसुत्र हस्तगत केली. कबीर बाबु राजपूत उर्फ मनावत (रा. पुसाणे ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्यावर्षी वडगाव येथील पुजा गार्डन मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी आलेल्या सविता राजेंद्र घोरपडे (रा. खडकी ) यांच्या गळ्यातील ८ तोळे वजनाचे मंगळसुत्र हिसकावत पळविले होते. तसेच्या दोन दोन वर्षांपूर्वी वडगाव येथील वंदना नितीन म्हाळसकर ह्या न्यू इंग्लिश स्कूल जवळच्या रोडने पायी जात असताना साडेसात तोळे वजनाचे मंगळसुत्र हिसकाऊन पळून नेले होते. तसेच कान्हे फाटा येथील अमोल गौतम गायकवाड यांचे जोडून सोन्या -चांदीचे दागिने चोरून नेले होते. तीनही ठिकाणी चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली असून चोरलेले सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
गुन्हे शाखेचे अन्वेषण पोलिस निरीक्षक पद्माकर अनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्यावेळी लोणावळा विभागीय पोलिस हद्दीत गस्त घालत असताना माहिती मिळाली की, जबरी चोरी करणारा आरोपी तळेगाव-उर्से खिंडीत येत आहे. त्यानंतर पोस उपनिरीक्षक राजगुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील, दतात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, गणेश महाडीक यांनी सापळा रचून त्याला अटक केली.