"तुला जिवे ठार मारतो", राजीनाम्यासाठी सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला, मुळशीतील घटना

By नारायण बडगुजर | Updated: May 3, 2023 18:33 IST2023-05-03T18:32:16+5:302023-05-03T18:33:30+5:30

सरपंचपदाचा राजीनामा द्यावा म्हणून आरोपींनी हातात सिमेंटचा ब्लाॅक आणि दगडाने महागड्या गाडीचे नुकसानही केले

women sarpanch Husband attack in mangao mulshi taluka | "तुला जिवे ठार मारतो", राजीनाम्यासाठी सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला, मुळशीतील घटना

"तुला जिवे ठार मारतो", राजीनाम्यासाठी सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला, मुळशीतील घटना

पिंपरी : महिलेने सरपंच पदाचा राजीनामा द्यावा म्हणून तिच्या पतीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक मारून जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच महागड्या गाडीचे नुकसान केले. याप्रकरणी १७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्राणघातक हल्ल्याची ही घटना मुळशी तालुक्यातील माणगाव येथे रविवारी (दि. ३०) रात्री सव्वाच्या सुमारास घडली.  

सचिन मच्छिंद्र आढाव (वय ३९, रा. गणेशनगर, डांगे चौक) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ३०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रवी बोडके, राज बहिरट, प्रदीप पारखी, सोन्या बोडके, सचिन बोडके (रा. माण, ता. मुळशी) व इतर १० ते १२ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन आढाव यांची पत्नी अर्चना आढाव या माणगावच्या सरपंच आहेत. अर्चना आढाव यांनी सरपंचपदाचा राजीनामा द्यावा म्हणून आरोपींनी हातात सिमेंटचा ब्लाॅक घेऊन फिर्यादीच्या महागड्या गाडीचे दगडाने नुकसान केले.  तसेच आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक मारून जखमी केले. तुला जिवे ठार मारतो, असे म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीला जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मुदत तपास करीत आहेत.

Web Title: women sarpanch Husband attack in mangao mulshi taluka