हॉटेलवर जेवायला जाण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 16:14 IST2019-09-01T16:12:18+5:302019-09-01T16:14:32+5:30

महिलेला हॉटेलवर जेवणासाठी जाण्याचे सांगत तिला जबरदस्तीने लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी भोसरी येथे घडली.

Woman sexual harrshed to went dinner | हॉटेलवर जेवायला जाण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

हॉटेलवर जेवायला जाण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

पिंपरी : महिलेला हॉटेलवर जेवणासाठी जाण्याचे सांगत तिला जबरदस्तीने लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी भोसरी येथे घडली.
 अविनाश पथकुंडे (वय २४, रा. धावडेवस्ती भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश आणि फिर्यादी महिला एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओळखीचा फायदा घेऊन ११ फेब्रुवारी रोजी दुपारी आरोपी अविनाश याने फिर्यादी महिलेला गाडीवर बसून जेवण करून  येऊ असा बहाणा केला. त्यातून अविनाश याने महिलेला भोसरी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Woman sexual harrshed to went dinner