Pune Crime | भोसरीत मारहाण करून महिलेचा केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 13:16 IST2022-04-26T13:15:30+5:302022-04-26T13:16:40+5:30

पिंपरी : दरवाज्यात सिमेंटचे ब्लॉक, दगडी, विटा आणि लाकडे का टाकतो, असा जाब महिलेने विचारला. त्यामुळे मारहाण करून महिलेचा ...

woman molested by beating in bhosari pune latest crime news | Pune Crime | भोसरीत मारहाण करून महिलेचा केला विनयभंग

Pune Crime | भोसरीत मारहाण करून महिलेचा केला विनयभंग

पिंपरी : दरवाज्यात सिमेंटचे ब्लॉक, दगडी, विटा आणि लाकडे का टाकतो, असा जाब महिलेने विचारला. त्यामुळे मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. भोसरी येथे २१ एप्रिल रोजी रात्री नऊ ते पावणेदहा या कालावधीत हा प्रकार घडला.

अक्षय संजय अग्रवाल, संजय ज्वारीमल अग्रवाल (वय ५२) आणि दोन महिला (सर्व रा. भोसरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने याप्रकरणी सोमवारी (दि. २५) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक, दगडी, विटा, लाकडे आमच्या दरवाजात का टाकतो, असे फिर्यादी महिलेने विचारले. त्यामुळे आरोपी अक्षय याने अश्लील हावभाव करून फिर्यादीस शिवीगाळ केली. आरोपी अक्षय याच्या आई आणि बहिणीने फिर्यादीस मारहाण केली.

फिर्यादीचे पती भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना सिमेंटचा ब्लॉक मारला. संजय अग्रवाल याने गैरवर्तन करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. मारहाण करून आरोपी निघून गेल्यानंतर आरोपी अक्षय याच्या आईने फोन केला. केस मागे घे नाहीतर मी तुझ्यावर विनयभंगाची केस दाखल करीन, अशी फोन करून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: woman molested by beating in bhosari pune latest crime news