आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 12:52 IST2019-01-17T12:51:40+5:302019-01-17T12:52:43+5:30

रावेत येथील बास्केट पुलावरून उडी मारून ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली.

The woman committed suicide due to her illness | आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

पिंपरी : रावेत येथील बास्केट पुलावरून उडी मारून ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. मंगल अशोक शिंदे असे तिचे नाव आहे. आजाराला कंटाळून महिलेने  पुलावरून बुधवारी रात्री पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. गुरुवारी सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने पोलिसांनी पवना नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला उत्तरीय तपासणीसाठी औंध रुग्णालयात मृतदेह पाठवला आहे. अधिक तपास वाकड पोलीस  करीत आहेत.

Web Title: The woman committed suicide due to her illness