Pune | प्रेमसंबधाला विरोध केल्याने पतीने काढले पत्नीला घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 17:39 IST2023-01-13T17:38:44+5:302023-01-13T17:39:25+5:30

पोलिसांनी आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे...

wife who objected to her husband's love affair was thrown out of the house | Pune | प्रेमसंबधाला विरोध केल्याने पतीने काढले पत्नीला घराबाहेर

Pune | प्रेमसंबधाला विरोध केल्याने पतीने काढले पत्नीला घराबाहेर

पिंपरी : पतीचे प्रेमसंबंध दुसऱ्या एका महिलेसोबत आहेत, हे कळल्यानंतर पत्नीने त्याला विरोध केला. त्यामुळे माझे लग्न नीट लावून दिले नाही. माहेरून सोने घेऊन ये असे सांगून पतीने पत्नीला घराबाहेर काढले. ही घटना १४ मे २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत काळेवाडी, हडपसर येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि.१२) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला तिच्या पतीने तुझ्या घराच्यांनी लग्न व्यवस्थित लावून दिले नाही. लग्नात मानपान नीट केला नाही, असे बोलून मानसिक त्रास दिला. तसेच तुझ्या वडिलांकडून माझ्यासाठी सोन्याची चैन व अंगठी मागवून घे असे सांगितले. फिर्यादीने त्याला नकार दिला असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. आरोपीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाला फिर्यादीने विरोध केला. तेंव्हा आरोपीने फिर्यादीला शिविगाळ करून घरातून हाकलून देऊन नांदविण्यास नकार दिला.

Web Title: wife who objected to her husband's love affair was thrown out of the house