डोक्यात कोयत्याने वार करून पत्नीची हत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 20:05 IST2018-07-06T20:05:27+5:302018-07-06T20:05:50+5:30

तीन मुलीच झाल्या तसेच शेतात कामास जात नसल्याच्या कारणावरून चिडून संगमताने लोखंडी कोयत्याच्या शरीरावर वार करून खून केला असल्याची तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात दिली आहे.

Wife murdered by weapons attack | डोक्यात कोयत्याने वार करून पत्नीची हत्या  

डोक्यात कोयत्याने वार करून पत्नीची हत्या  

कामशेत : ताजे गावात राहणाऱ्या युवकाने आपल्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिची हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी(दि.६जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला आहे. शुक्रवारी ( दि.६ ) सकाळी साडेनऊ वाजल्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पाथरगाव - ताजे रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या सादू शंकर केदारी यांच्या राहत्या घरात यश उर्फ भाऊ सादू केदारी व त्याची आई अंजना सादू केदारी व वडील सादू शंकर केदारी यांनी सूनेला तीन मुलीच झाल्या तसेच शेतात कामास जात नसल्याच्या कारणावरून चिडून संगमताने लोखंडी कोयत्याच्या शरीरावर वार करून साहाय्याने तिचा खून केला असल्याची तक्रार मनीषाचा भाऊ सुनील राम गोरे याने कामशेत पोलीस ठाण्यात दिली आहे. या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरार असून कामशेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेतील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी. पाटील हे करत आहेत.  

Web Title: Wife murdered by weapons attack