शिवीगाळ का करता? असे विचारले असता दोघांकडून पती - पत्नीसह, मुलालाही मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:38 IST2021-07-20T18:38:14+5:302021-07-20T18:38:22+5:30

दोघांविरोधात गुन्हा दाखल; त्यांनी लहान मुलाला जखमी करून दुचाकीची तोडफोड केली

Why do you swear When asked, both of them beat up the husband and wife and also the child | शिवीगाळ का करता? असे विचारले असता दोघांकडून पती - पत्नीसह, मुलालाही मारहाण

शिवीगाळ का करता? असे विचारले असता दोघांकडून पती - पत्नीसह, मुलालाही मारहाण

पिंपरी: शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता दोन जणांनी पती, पत्नी व त्यांच्या लहान मुलाला मारहाण करत दुचाकीचा तोडफोड केल्याची घटना शनिवारी गांधीनगर येथे घडली. याप्रकरणी नौशाद जब्बार सैय्यद (वय ३८, रा. गांधीनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहन खरात (वय २१), कृष्णा गोवर्धन लोकरे (वय २३, दोघेही रा. गांधीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैय्यद हे त्यांच्या घरासमोर उभे असताना दोन्ही आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता, असा जाब त्यांनी विचारला असता सैय्यद यांच्या पत्नीला आरोपींनी प्लॅस्टिकच्या बॅरिकेड्सने मारले. त्यानंतर सिमेंटच्या गट्टूने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला केला. मात्र सैय्यद यांनी तो चुकवल्याने सिमेंटचा गट्टू त्यांच्या लहान मुलाला लागून तो जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीची तोडफोड केली.

Web Title: Why do you swear When asked, both of them beat up the husband and wife and also the child