'तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया', म्हणत केला तरुणीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:42 IST2022-02-04T18:30:13+5:302022-02-04T18:42:45+5:30

पिंपरी : 'हमे तुम पसंत हो, तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया, म्हणत कामावर जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत ...

why did you tell dad about us said the young woman crime new | 'तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया', म्हणत केला तरुणीचा विनयभंग

'तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया', म्हणत केला तरुणीचा विनयभंग

पिंपरी : 'हमे तुम पसंत हो, तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया, म्हणत कामावर जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत विनयभंग केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. देविंद्र धनराज सिंग (वय ३३, रा बोडकेवाडी, ता. मुळशी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी गुरुवारी कामावर जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपी तिच्यामागे पीएमपी बसमध्ये बसला. 'क्या रे तुम सब मराठी लडको को तुम्हारा मोबाईल नंबर देती हो, हमे तुम पसंत हो, हमे तुमसे बातचीत करनी है, तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया', असे बोलून पुन्हा कंपनीच्या गेटपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या घरी जाऊन फिर्यादी यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

Web Title: why did you tell dad about us said the young woman crime new