शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पवना धरणातून सोडलेलं पाणी नेमकं जातंय तरी कुठं...? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 14:27 IST

गेल्या आठवडाभरापासून शहरात कमालीची पाणी टंचाई आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत. पवना धरण भरलेले आहे. तसेच पाणीही नदीत वेळेवर सोडले जाते. मग पाणी जातेय कोठे?...

ठळक मुद्देपाणी उचलणे आणि वितरण करणे ही व्यवस्था कोलमडलेली आमदार, खासदारांनी सज्जड दम देऊनही पाणी समस्या तशीचकृत्रिम पाणी टंचाईस कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी.लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनाही अधिकारी चुकीची माहिती देऊन दिशाभूल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे पाणी टंचाई जाणवत आहेत. पवना धरणातून पुरेसा पाणी पुरवठा होत असताना महापालिकेचे अधिकारी पाणी पुरेसे नाही असे सांगत आहेत. पवना धरणातून सोडलेले पाणी मुरतेय कोठे? असा प्रश्न निर्माण होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण, पवनानदी, रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. पाणी उचलणे आणि वितरण करणे ही व्यवस्था कोलमडली आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरात कमालीची पाणी टंचाई आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत. आमदार, खासदारांनी सज्जड दम देऊनही पाणी समस्या तशीच आहे. पवना धरण भरलेले आहे. तसेच पाणीही नदीत वेळेवर सोडले जाते. मग पाणी जातेय कोठे? हे विचारण्यासाठी महापौर राहूल जाधव यांनी बैेठक घेतली होती. शुक्रवारपर्यंत मुदत दिली होती. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाला दिलेली मुदत संपली तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि जलसंपदा, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यातील पाणी पुरवठ्याच्या आकडेवारीत तफावत आहे. लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनाही अधिकारी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. त्यांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पाठीशी घालत आहेत. तसेच पाणी समस्येस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती आणि पदोन्नतीची बक्षिसी दिली जात आहे.शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले, धरणातून पाणीपुरवठा होत आहे. मग गळती कोठे आहे. पाणी वितरण स्तरावर गळती आहे. प्रशासनातच गळती आहे. ही गळती शोधण्याची गरज आहे. कृत्रिम पाणी टंचाईस कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी. नागरिकांना वेठीस धरणाऱ्या  अधिकारी आणि प्रशासनास वठणीवर आणण्याची गरज आहे. आयुक्तांनी आपली कार्यक्षमता दाखवावी. 

दिनांक,                           महापालिका अधिकाऱ्यांची माहिती,          पाटबंधारे विभागाची माहिती (पाणीपुरवठा एमएलडीत)११ आॅक्टोबर                            ४८४                                                           ७३४१२ आॅक्टोबर                             ४७३                                                             ७३४१३ आॅक्टोबर                            ४७२                                                             ७८३१४ आॅक्टोबर                            ४६१                                                             ८५६१५ आॅक्टोबर                            ४५४                                                             १०६०१६ आॅक्टोबर                           ४७०                                                             ८५७१७ आॅक्टोबर                           ४५७                                                              ८५७१८ आॅक्टोबर                          ४६७                                                             ८२६. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीriverनदीDamधरण