शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

जेव्हा स्मशानभूमीलाही अश्रू अनावर होतात... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 4:02 PM

तुळजापुरला दर्शनासाठी जाऊन परत येत असताना भिगवणजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडली होती.

ठळक मुद्देभिगवण येथील अपघातात एकाच कुटूंबातील पाच मृत जणांवर अंत्यसंस्कार चार पिढ्यांच्या या नात्यांची गुंफन असलेली शृंखला अपघाताच्या घटनेने तुटली

पिंपरी : देवदर्शनाहून परतत असताना गायकवाड कुटुंबावर शुक्रवारी सायंकाळी काळाने घाला घातला. एका क्षणार्धात कुटुंबातील पाच जण नियतीने यात हिरावून नेले. हा दिवस गायकवाड कुटुंब कधीही विसरु शकणार नाही.आई, वडील, मुले, सून आणि नातू अशा नात्यांची गुंफन असलेल्या एकाच कुटूंबातील पाच जणांवर निगडीतील स्मशानभूमीत शनिवारी सकाळी अत्यंत दु:ख आणि क्लेशदायक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातवाईकांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आकोशाने स्मशानभूमीही गहिवरली...नियतीच्या या खेळाने जीवनावरील तिची पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली.. हेच सत्य...     तुळजापुरला दर्शनासाठी जाऊन परत येत असताना भिगवणजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडली होती. जेव्हा गायकवाड कुटुंबिय राहत असलेल्या यमुनानगर परिसरात ही दु: खद घटना समजली. त्यावेळेपासून तिथे हळहळ व्यक्त करण्यात येत होती. शनिवारी सकाळी एकाच वेळी निघालेल्या अंत्ययात्रेच्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत नातेवाईकांनी अक्षरश: हंबरडा फोडला. या दु:खमय वातावरणामुळे अमरधाम स्मशानभुमी गहिवरली. सकाळी ८ वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याने ७ वाजता यमुनानगर येथून अंत्ययात्रा निघणार होती. तत्पूर्वी प्रकाश यांचे ९५ वषार्चे माता पिता यांना अंत्यदर्शनासाठी खाली आणले. वयोवृद्ध दांपत्याला वयोमानामुळे या घटनेबद्दल काही उमजत नव्हते. एकाच वेळी मुलगा,सून, नातू, नातसून आणि पणतू यांची अंत्ययात्रा त्यांच्या डोळ्यादेखत निघाली. हा प्रसंग पाहणाऱ्यांना गहिवरून आले. प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७), सुनीता प्रकाश गायकवाड (वय ५८) हे दांपत्य तसेच मुलगा संदीप प्रकाश गायकवाड (वय ४०) सून शीतल संदीप गायकवाड (वय ३२) आणि नातू अभिराज संदीप गायकवाड (वय ५) अशा या गायकवाड कुटूंबातील सदस्यांची एकत्रित निघालेली अंत्ययात्रा मन हेलावणारी होती. देवदर्शनासाठी गेलेल्या मोटारीत असलेल्या प्रमोद प्रकाश गायकवाड (वय ३०), हेमलता प्रमोद गायकवाड ( वय २८)  या दोघांनी शक्रवारी भररस्त्यातील हे मृत्यूचे तांडव पाहिले. त्यांनाही अपघाताची झळ बसली असून प्रमोद आणि हेमलता दोघेही जखमी झाले आहेत. हेमलताची प्रकृती चिंताजनक आहे.प्रमोद आणि हेमलता दिघीत राहतात. गायकवाड कुटुंबीय देवदर्शनासाठी मोटार घेऊन यमुनानगर येथून निघाले, त्यांनी दिघीतून प्रमोद आणि हेमलता यांना बरोबर घेतले होते. वडिल प्रकाश, आई सुनीता,भाऊ संदीप, वहिणी शीतल, आणि पुतण्या अभिराज यांचा अपघाती मृत्यू तसेच गंभीर जखमी झालेली पत्नी हे दृश्य प्रमोद यांच्यासाठी काळीज पिळवटून टाकणारे होते.  नात्याच्या उतरंडीची शृखंला तुटलीवयोवृद्ध असलेले ९५ वर्षांचे प्रकाश आणि संदीप यांचे आईवडील घरीच होते. तर विश्वराज हा त्यांचा सहा वर्षांचा पणतू सांगलीतील कवठेमहाकाळ जवळील वाघोली येथे उन्हाळी सुटीत मामाकडे गेला होता. पणजोबा, पणजी आणि पणतू हे या दुर्घटनेची झळ बसण्यापासून दूर राहिले. ९५ वर्षांच्या वयोवृद्ध दांपत्यास वयोमानामुळे कुटूंबियांवर काय संकट ओढवले हे समजू शकत नाही. तर मामाकडे गेलेल्या चिमुकल्या विश्वराज याला आई, वडिल आणि भाऊ अभिराज आणि आजी,आजोबा या जगातून नाहीसे झाल्याने पोरके होण्याची वेळ आली आहे. चार पिढ्यांच्या या नात्यांची गुंफन असलेली शृंखला अपघाताच्या घटनेने तुटली आहे. वयोवृद्ध पणजी, पणजोबा आणि अवघा सहा वर्षांचा चिमुकला विश्वराज राहिला आहे. वडिल गेले, चुलते प्रमोद जखमी आहेत. पण अगदी जवळच्या नात्याचे माता पित्याचे छत्र हरपल्याने चिमुकला पोरका झाला आहे. 

टॅग्स :nigdiनिगडीPuneपुणेBhigwanभिगवणAccidentअपघातDeathमृत्यू