शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘प्रेमासाठी वाट्टेल ते’..! पिंपरी-चिंचवड शहरातून नऊ महिन्यांत दोनशेवर मुला-मुलींची ‘धूम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 14:13 IST

पिंपरीतील अल्पवयीन मुलांचे ‘उद्योग’

ठळक मुद्देफूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांत 219 गुन्हे दाखल

नारायण बडगुजर-पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून यंदा नऊ महिन्यांत अल्पवयीन असलेल्या 219 मुली व मुलांना फूस लावून पळवून नेण्यात आले. यात प्रमाचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आलेले अल्पवयीन दोनशेवर आहेत. यातील 146 मुले व मुली मिळून आल्या आहेत.  

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांना प्रवासी अथवा इतर वाहतुकीस मनाई करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच काही निर्बंधांसह प्रवासाला मुभा देण्यात आली. अनलॉक प्रक्रियेत प्रवासावरील निर्बंध कमी करण्यात आले. याचा फायदा घेत काही टवाळखोर किशोरवयीन मुलींना पळवून नेत आहेत. प्रवासाची सुविधा होताच ते धूम ठोकत आहेत. ‘प्रेमासाठी कायपण’, असे म्हणत अल्पवयीन मुली व मुले ‘सैराट’ होत आहेत. यातूनच प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून अल्पवयीनांना पळवून नेल्याचे प्रकार वाढत आहेत. नकळत्या वयात ही अल्पवयीन मुले व मुली घराचा उंबरा ओलांडून गेल्याने पालक हतबल झाले आहेत. --------------+++-------------अल्पवयीन मुलांच्या शोधासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक नियमावली व राज्य शासनाने ठरवून दिलेली कार्यप्रणाली यानुसार पोलीस याप्रकरणात तपास करतात. प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यासाठी स्वतंत्र ‘सेल’ आहे. अल्पवयीनांना पळवून नेल्या प्रकरणाचा प्रत्येक गुन्हा गंभीर असतो. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस अशा अल्पवयीनांचा शोध घेतात.- आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड-------------+-----किशोरवयीन अवस्थेतील मुली व मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी स्वत:ला अभ्यास किंवा इतर कामांत गुंतवून ठेवावे. छंद जोपासावेत आणि दूरगामी विचार करण्याची तयारी ठेवावी. मित्र व मैत्रिणींइतकाच मोकळा संवाद आपल्या आईवडिलांशी साधावा.     - ॲड. गौरी राऊळ, सदस्य, बालसुधार समिती, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय-----------+----------अशा प्रकरणांमध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पळून गेलेली मुले घरी परतल्यानंतर त्यांना समजून घेतले पाहिजे. आपल्या मुलांचे मित्र व मैत्रिणींबाबत पालकांना माहिती पाहिजे. घरातील प्रत्येकाने सुसंवाद साधला पाहिजे. मुले एकटी पडणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावा.- ॲड. संतोष मोरे, सदस्य, बालसुधार समिती, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय---------------------------+-------अशा प्रकरणात मुलामुलींनी खूप मोठा गुन्हा केल्याचा समज करून घेतला जातो. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. या मुलामुलींना योग्य मार्गदर्शनाची व मानसिक आधाराची गरज असते. आईवडिलांसह पोलिसांनी देखील त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.   - जैद सय्यद, प्रकल्प अधिकारी, रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टीस, पुणे   -----------------++++जानेवारी ते सप्टेंबर 2020 पळवून नेण्यात आलेले अल्पवयीनजानेवारी – 63 फेब्रुवारी – 51 मार्च – 28 एप्रिल – 11मे – 9जून – 15 जुलै – 14ऑगस्ट – 22 सप्टेंबर – 32एकूण – 219मिळून आलेले अल्पवयीन – 146

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmarriageलग्नPoliceपोलिसrelationshipरिलेशनशिप