काय हा खोटारडेपणा! मृत व्यक्तीच्या पत्नीला फसवले; बँक खात्यातून ४ लाख हडपले
By रोशन मोरे | Updated: May 22, 2023 15:26 IST2023-05-22T15:25:38+5:302023-05-22T15:26:16+5:30
मृत व्यक्तीच्या बँक खात्यावरून आपणच ती व्यक्ती असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे देऊन ४ लाख रुपयांची एफडी काढून घेतली

काय हा खोटारडेपणा! मृत व्यक्तीच्या पत्नीला फसवले; बँक खात्यातून ४ लाख हडपले
पिंपरी : मृत व्यक्तीच्या बँक खात्यावरून आपणच ती व्यक्ती असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र तसेच कागदपत्रे देऊन चार लाख रुपयांची एफडी काढून घेतले. मृताची पत्नी जेंव्हा बँकेत पैसे काढण्यासाठी आली तेंव्हा तिच्या पतीने पैसे काढून नेल्याचे तिला सांगितले. मात्र, आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे म्हणून आपण पैसे काढण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले, त्यानंतर बँकेची फसवणूक झाल्याचे उघड झाले. ही घटना १८ नोव्हेंबर २०२१ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत भोसरी येथे घडली. या प्रकरणी राहुल चंद्रकांत नाईक (वय ५५, रा.वारजे नाका) यांनी रविवारी (दि.२१) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रमाशंकर बाबुराम विश्वकर्मा ( रा. दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना खोटी कागदपत्रे सादर करून तसेच खोटे प्रतिज्ञापत्र (हानीरक्षण बंधपत्र) देवून नाव साधर्म्य असलेल्या बँकेच्या दुसऱ्या मयत रमाशंकर जे विश्वकर्मा यांच्या नावावर असलेली मुदत ठेव व रिकरिंग खात्यावरून चार लाख ३१ हजार ७७१ फसवणुकीने काढून घेतले. आरोपीने आपल्याकडे ठेवीच्या असलेल्या पावत्या हरवल्याचे त्याच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. हे पैसे काढल्यानंतर मुळ खातेदार रमाशंकर जे विश्वकर्मा यांच्या पत्नी बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या तेंव्हा बँकेतून पैसे अधिच कोणीतरी काढल्याचे त्यांना समजले.