जेवणाच्या वादातून हॉटेल चालकावर कोयत्याने वार; पिंपळे निलख येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 16:48 IST2021-03-18T16:40:24+5:302021-03-18T16:48:34+5:30

तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.....

The weopan attack on hotel owner in a meal dispute; Incident at Pimple Nilakh | जेवणाच्या वादातून हॉटेल चालकावर कोयत्याने वार; पिंपळे निलख येथील घटना 

जेवणाच्या वादातून हॉटेल चालकावर कोयत्याने वार; पिंपळे निलख येथील घटना 

पिंपरी : जेवण देण्याच्या वादातून पाच जणांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण करीत कोयत्याने वार केल्याची घटना पिंपळे निलख येथे घडली. या प्रकरणी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अमोल धुमाळ, अंबादास पासलकर, अक्षय राक्षे, अभि मोरे, राजू फडतरे (सर्व रा. पिंपळे निलख) आणि सात ते आठ अनोळखी व्यक्तिंविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धुमाळ, राक्षे आणि मोरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अक्षय अशोक चव्हाण (वय २५, रा. पाखरे हाईट्स, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी 16 मार्च रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास पिंपळे निलख बाणेर रस्त्यावरील हॉटेल विसावा येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जेवण देण्यावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आरोपी आपल्या समवेत आणखी काही जणांना घेऊन आले. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. दगड फेकून मारले. पासलकर त्याने माझ्या पोरांना जेवण देत नाही तुला माज आलाय का? मी इथला भाई आहे असे म्हणत कोयत्याने डोक्यात दोन वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The weopan attack on hotel owner in a meal dispute; Incident at Pimple Nilakh