बिर्ला हॉस्पिटलजवळ पाणी वाहिनी फुटली; उद्या काही भागात पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 20:25 IST2025-10-26T20:23:52+5:302025-10-26T20:25:30+5:30
- चिंचवडगावातून थेरगावला जाणाऱ्या रस्त्यावरील बिर्ला हॉस्पिटलच्या भागात रविवारी सायंकाळी पाणी पुरवठा वाहिनी फुटली आहे

बिर्ला हॉस्पिटलजवळ पाणी वाहिनी फुटली; उद्या काही भागात पाणीपुरवठा बंद
पिंपरी : चिंचवड गावातून थेरगावला जाणाऱ्या रस्त्यावरील बिर्ला हॉस्पिटलच्या भागात एक हजार मिमी व्यासाच्या पाणी पुरवठा वाहिनी फुटली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उद्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
चिंचवडगावातून थेरगावला जाणाऱ्या रस्त्यावरील बिर्ला हॉस्पिटलच्या भागात रविवारी सायंकाळी पाणी पुरवठा वाहिनी फुटली आहे. त्यामुळे पाण्याचे फवारे उडत होते. या वाहिनीवरून थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर आणि रहाटणी या भागांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे संबंधित भागात अचानक पाणी पुरवठा पूर्णपणे थांबवावा लागला आहे.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्या सकाळी पाणी पुरवठा सुरु करण्याचा विभागाचा प्रयत्न असेल. पाणीपुरवठा तात्पुरता बंद असल्यामुळे थेरगाव ते पिंपळे निलखपर्यंतच्या भागात पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून आणि बचत करून महापालिका व पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी केले आहे.