शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात मोशीत पाणीटंचाई

By admin | Updated: August 8, 2015 00:26 IST

मोशीतील शिवाजीवाडी परिसरामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

मोशी : मोशीतील शिवाजीवाडी परिसरामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. परंतु, रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास नळावर पाण्याची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये अडचणीचे ठरत आहे. शिवाजीवाडीमध्ये आठ दिवसांपासून रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या भागात दररोज सकाळी ८.३० ते १०पर्यंत पाण्याची वेळ असल्याचे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात मात्र पाणी येतच नसून, अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्यामध्ये जेवढा त्रास नाही, त्यापेक्षा अधिक त्रास पावसाळ्यामध्ये सहन करावा लागत असल्याची तक्रार महिलावर्गातून केली जात आहे. या भागात कामगारवर्गाचे प्रमाण जास्त आहे. पिण्याच्या पाण्यामुळे अनेकांना कामे सोडून घरी थांबावे लागत आहे. तसेच. रहिवाशीवर्गाकडून मीटरप्रमाणे पाणीबिल घेतले जात असतानाही नाहक त्रास सहन करण्याची वेळ रहिवाशीवर्गावर येऊन ठेपली आहे. या भागातील पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा. तसेच, जास्त दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी नामदेव सस्ते, तुकाराम सस्ते, विलास मोहिते, अतुल वाळुंज यांनी केली आहे. याबाबत पाणी विभागाचे अधिकारी प्रशांत कोतकर म्हणाले, ‘‘या भागातील जलवाहिनीचे काम सुरू आहे. लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होईल.’’(वार्ताहर)