पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे विवाहितेने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 16:27 IST2021-11-25T16:21:36+5:302021-11-25T16:27:12+5:30

पिंपरी: पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध, तसेच पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. यमुनानगर, निगडी ...

waman commits suicide husband love affair with another woman | पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे विवाहितेने केली आत्महत्या

पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे विवाहितेने केली आत्महत्या

पिंपरी: पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध, तसेच पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. यमुनानगर, निगडी येथे मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन युवराज घारगे (वय ३०, रा. यमुनानगर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा पती आरोपी नितीन याने लग्नानंतर दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यावरून फिर्यादी यांच्या बहिणीला त्याने वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्या कारणावरून वाद काढून तिला कायम मारहाण व शिवीगाळ केली.

दररोजच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांच्या बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरोेधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: waman commits suicide husband love affair with another woman