व्हाॅट्सअॅपवरुन महिलेला अश्लिल व्हिडीअाे काॅल ; पिंपळे गुरव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 20:03 IST2018-11-19T20:02:20+5:302018-11-19T20:03:44+5:30

पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या महिलेला व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

vulgar video call to women on whats app | व्हाॅट्सअॅपवरुन महिलेला अश्लिल व्हिडीअाे काॅल ; पिंपळे गुरव येथील घटना

व्हाॅट्सअॅपवरुन महिलेला अश्लिल व्हिडीअाे काॅल ; पिंपळे गुरव येथील घटना

पिंपरी : पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या महिलेला व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिडित महिलेने याप्रकरणी रविवारी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. 

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या महिलेला रविवारी रात्री अाठच्या सुमारास एका अनाेळखी नंबरवरुन तुम्हाला व्हिडीअाे काॅल करु का ? असा व्हाॅट्सअॅपवर मेसेज अाला. यावर महिलेने अज्ञात व्यक्तीला तुम्ही काेण अाहात ? तुम्हाला नंबर काेणी दिला ? अशी विचारणा केली. परंतु समाेरच्या व्यक्तीने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर काहीवेळाने त्यांना त्याच नंबरवरुन व्हिडीअाे काॅल अाला. ताे त्यांनी उचलला असता, समाेरील व्यक्तीने अश्लील हावभाव केले. या सर्व प्रकारामुळे ती महिला घाबरली. त्या महिलेने पाेलिसांकडे धाव घेतली.  घडला प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. निकुंभ या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: vulgar video call to women on whats app