शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मतदार प्रबोधन फेरी

By admin | Updated: January 25, 2017 18:53 IST

मतदार दिवसानिमित्त प्रबोधन फेरी

 

पिंपरी:भक्ती शक्ती निगडी ते प्रा. रामकृष्ण मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी दरम्यान मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये  विविध ठिकाणी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीसह शिक्षक, प्राध्यापकांसह हजारो युवक युवतींचा सहभाग होता. 

मतदार दिनानिमित्त मतदार नोंदणीसाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या  उपजिल्हा निवडणूक अधिकारी समिक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, तहसिलदार महेश पाटील, पल्लवी घाटगे, नायब तहसिलदार स्नेहा चाबुकस्वार तसेच सुषमा पैकीकरी व अंजली सावंत यांचा सत्कार केला.

आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते वितरण केले. यामध्ये पथनाटय स्पर्धेत  सिंहगड महाविद्यालय वडगाव यांचा प्रथम क्रमांक,  डॉ. डी.वाय पाटील महाविद्यालयांचा द्वितीय, मॉडर्न कॉलेज आॅफ फार्मसी यांचा तृतीय क्रमांक आला असून महात्मा फुले महाविद्यालय व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. स्किट स्पर्धेमध्ये हिमानी पडलसेकर या डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक, प्राची अगरवाल या एटीएसएसच्या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक तर क्षितीजा साळवे या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये शुभम पोरे, डॉ. डी.वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी आणि दिव्या कुलकर्णी, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांना प्रथम कमांक विभागून दिला. हर्षदा वाबळे, अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय व ज्ञानेश्वर भंडारे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांना द्वितीय क्रमांक विभागून आणि प्रतिकराज बान, प्रतिभा कॉलेज चिंचवड आणि डफळ पूजा प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. व्यंगचित्र या स्पर्धेत प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा कु-हाडे यमनूर, व प्रतिभा कॉलेजची कवडे ज्योती यांना प्रथम क्रमांक, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा अभिषेक बैसाणे व इंदिरा कॉलेज वाकड येथील वृधी चोणकर यांना द्वितीय क्रमांक आणि अश्रृत वाघमारे व मधुरा शंकरपुरे या अनंतराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. कोलाज या स्पर्धेमध्ये प्रतिक्षा हगवणे या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक, धनश्री भागवतकर, प्रतिभा कॉलेज चिंचवड आणि काजल कांबळीने तृतीय क्रमांक आला.