पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नियमांचे उल्लंघन! विनामास्क फिरणाऱ्या ४४८ नागरिकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:39 PM2021-05-23T18:39:25+5:302021-05-23T18:39:31+5:30

कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत घट होत असली तरी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Violation of rules even in Pimpri Weekend Lockdown! Action against 448 unmasked citizens | पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नियमांचे उल्लंघन! विनामास्क फिरणाऱ्या ४४८ नागरिकांवर कारवाई

पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नियमांचे उल्लंघन! विनामास्क फिरणाऱ्या ४४८ नागरिकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देप्रशासनाकडून कोरोना विषाणूंच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना

पिंपरी: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असतानाही बेशिस्त नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशाच पद्धतीने शनिवारी विनामास्क फिरणाऱ्या ४४८ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत घट होत असली तरी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही बेशिस्त नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच काही नागरिक मास्कचा योग्य वापर करीत नसल्याचे दिसून येते. अशा नागिरकांवरही कारवाई होत आहे. 

एमआयडीसी भोसरी (३६), भोसरी (११), पिंपरी (०७), चिंचवड (१५), निगडी (०३), आळंदी (४१), चाकण (०६), दिघी (१४), सांगवी (१०),  हिंजवडी (३४), देहूरोड (२८), चिखली (१३), रावेत चौकी (०५), शिरगाव चौकी (१८), म्हाळुंगे चौकी (०१) या पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी शनिवारी ४४८ जणांवर कारवाई केली. नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे.

Web Title: Violation of rules even in Pimpri Weekend Lockdown! Action against 448 unmasked citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.