VIDEO : इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करत गायींच्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 22:07 IST2021-09-03T22:06:42+5:302021-09-03T22:07:12+5:30
लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात मागील काळात देखील अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. बजरंग दलाकडून कडक कारवाईची मागणी

VIDEO : इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करत गायींच्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार
लोणावळा : रात्रीच्या वेळी गायी व वासरांना बेशुद्ध करुन पळवून नेण्याचा प्रकार गुरुवारी (दि 2) रोजी पहाटेच्या सुमारास लोणावळ्यातील ओळकाईवाडी येथील शिंदे हॉस्पिटल जवळ सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची घटना समोर आली आहे.
ओळकाईवाडी येथे रात्रीच्या सुमारास विश्रांती घेत असलेल्या गायी व वासरांना काही गो तस्करांनी पाव खायला टाकून तसेच भुलीचे इंजेक्शन देऊन गा बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना स्कॉर्पिओ गाडीमध्ये निर्दयीपणे भरत तस्करी केली जात असल्याचा प्रकार सीसीटिव्हीमुळे उघड झाला आहे. त्यानंतर गोप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे हिंदु समाज्याच्या भावना दुखावल्या जात आहे. असा अनुचित प्रकार पुन्हा घडू नये याकरिता गुन्हेगारांना त्वरीत अटक करण्यात यावी असे निवेदन विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मावळ, वारकरी सांप्रदाय व हिंदु समिती लोणावळा यांच्या वतीने मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे, आमदार सुनिल शेळके तसेच लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन व लोणावळा शहर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
खळबळजनक ! गायींना इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करत पळवून नेण्याची घटना सीसीटीव्ही कैद; लोणावळ्यातील खळबळजनक प्रकार pic.twitter.com/ouaIXEvWcC
— Lokmat (@MiLOKMAT) September 3, 2021
ही घटना लक्षात घेता लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी आम्ही या गुन्हेगारांचा शोध घेऊन लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुधिर राईलकर, तालुका अध्यक्ष गोपीचंद कचरे, पुणे जिल्हा संयोजक बाळा खांडभोर आदी कार्यकर्त उपस्थित होते.
मागील काळात देखील लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. परंतु आज हा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे उघडकीस आला आहे. तरी या प्रकाराला कुठेतरी आळा बसावा यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे, असे काही प्रकार घडताना आढळ्यास ताबडतोब लोणावळा पोलीस ठाण्यास कळवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.