Video: तुम्ही आमचं बांधकाम पाडलं तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईन; अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:46 IST2025-08-04T15:42:43+5:302025-08-04T15:46:12+5:30

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला पोटचा गोळा खाली फेकून देण्याची धमकी दिली

Video: If you demolish our building, I will throw my baby down; Threatens officers who went to take action against encroachment | Video: तुम्ही आमचं बांधकाम पाडलं तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईन; अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना धमकी

Video: तुम्ही आमचं बांधकाम पाडलं तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईन; अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना धमकी

पिंपरी चिंचवड: तुम्ही आमचं बांधकाम पाडलं तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईन व मी सुद्धा जीवन संपवेन असं म्हणत एका व्यक्तीनं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या पथकाला विरोध केला. ही घटना घडली पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरात घडली. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला पोटचा गोळा खाली फेकून देण्याची धमकी दिली. सांगवी परिसरातलं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी होते.

राजाराम लाड, निलेश लाड यांचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी लगबग सुरू होती. मात्र याच वेळी इमारतीवरून या दोघांनी स्वतःच बाळ खाली फेकून देण्याची धमकी दिली. तुम्ही जर हे बांधकाम पाडलं तर तीन वर्षाच्या बाळाला मी खाली फेकून देईन. असं म्हणत त्याने या पथकाला विरोध केला. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. जाळीतून हे बाळ खाली फेकून देईन अशी वारंवार धमकी हे लाड कुटुंबीय देत होतं. इतकंच नाही तर त्याने अनधिकृत पाडण्यासाठी आलेल्या या पथकाला शिवीगाळही केली.

यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात राजाराम लाड आणि निलेश लाड यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली पोलीस स्टेशनला पुणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील उपअभियंता श्याम गर्जे यांनी फिर्याद दिली. की ते जेव्हा अतिक्रमण कारवाई करण्याकरता गेले असता तेथील घरमालक राजाराम लाड आणि निलेश लाड यांनी त्यांच्या बाळाला खाली फेकून खाली फेकून म्हणजे तुम्ही जर आमचे घर पाडले तर बाळाला खाली फेकून देईल. आत्महत्या करेल अशी धमकी दिल्याची आणि सरकारी कामात व्यत्यय आणल्याची फिर्याद उपायुक्त यांनी दिली.  त्यावरून सांगवी पोलीस स्टेशनला येथे गुन्हा दाखल आहे व आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच राजाराम लाड आणि निलेश लाड हे फरार झाले आहेत.

Web Title: Video: If you demolish our building, I will throw my baby down; Threatens officers who went to take action against encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.