तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु मारुन दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:12 IST2019-07-14T20:10:47+5:302019-07-14T20:12:27+5:30

पूर्वी झालेले भांडण मिटवण्यासाठी घराबाहेर बोलवून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. १३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

The victim kills the cement | तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु मारुन दुखापत

तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु मारुन दुखापत

 पिंपरी : पूर्वी झालेले भांडण मिटवण्यासाठी घराबाहेर बोलवून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. १३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
    निखील अनिल चव्हाण (वय २९, रा. आदर्शनगर, नवी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश माने आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी महेश आणि जखमी निखील या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. हे भांडण मिटवण्याचे नाटक करुन महेशने निखील याला शनिवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर बोलवून घेतले. निखील त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने ‘माझी माफी माग नाहीतर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन’, अशी धमकी दिली. यादरम्यान महेश याच्या दोघा साथीदारांनी निखील याला पकडून ठेवले तर महेश याने सिमेंटचा गट्टू निखील याच्या डोक्यात मारुन जखमी केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे पुढील तपास करत आहेत.

Web Title: The victim kills the cement