शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

वनाधिका-यांच्या हप्तेखोरीने स्थानिक त्रस्त; नियमांच्या बडग्याने व्यावसायिक, शेतक-यांकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 4:29 AM

मावळ तालुक्याच्या डोंगर भागात, तसेच गड-किल्ले परिसरात घरगुती व्यवसाय करणारे स्थानिक शेतकरी हे वन विभागाच्या अधिका-यांची अरेरावी व हप्तेखोरी यामुळे त्रस्त आहेत. शुक्रवारी वनपाल विलास निकम याला सिंहगड इन्स्टिट्यूटकडून ११ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत रंगेहाथ पकडले. त्यानंतर काही स्थानिकांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.

पिंपरी : मावळ तालुक्याच्या डोंगर भागात, तसेच गड-किल्ले परिसरात घरगुती व्यवसाय करणारे स्थानिक शेतकरी हे वन विभागाच्या अधिका-यांची अरेरावी व हप्तेखोरी यामुळे त्रस्त आहेत. शुक्रवारी वनपाल विलास निकम याला सिंहगड इन्स्टिट्यूटकडून ११ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत रंगेहाथ पकडले. त्यानंतर काही स्थानिकांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.मावळ हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत असताना सरकारी अधिकाºयांकडून आडकाठी आणली जात आहे. अरेरावी व हप्तेखोरी स्थानिकांकरिता डोकेदुखी ठरू लागली आहे. राजमाची किल्ला, लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला व भाजे लेणी, पवना धरणाचा संपूर्ण परिसर यामध्ये ठाकूरसाई, आपटी, तुंर्गी, चावसर, आंबेगाव, काले, दुधिवरे या सर्व परिसरात, तसेच नाणे मावळातील शिरोता धरण, उकसान धरण, वडेश्वर जलाशय, घोरावडेश्वर, लोहगड व विसापूर किल्ला, बेडसे लेणी, तिकोणा किल्ला या परिसरात मागील काही काळापासून पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी कृषी पर्यटनाची कास धरत या परिसरात लहान-मोठे हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत. धरण परिसरात तंबू लावून नागरिकांची राहण्याची सोय केली जाते. या व्यवसायांमधून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागाचे या व्यवसायांमधून आर्थिक सबलीकरण होत असताना अधिकारीवर्ग मात्र हप्तेखोरी करीत त्यांना त्रास देत आहे. मावळ हा डोंगरी व दुर्गम भाग असल्याने अनेक जमिनी या वनजमिनी तर काही खासगी वन, राखीव वन अशा प्रकारच्या आहेत.- वन विभागाच्या जागेत पर्यटक मुक्कामी अथवा जेवणाकरिता थांबलेले समजताच वन अधिकारी या मंडळींना गाठून त्यांच्याकडून कारवाईच्या नावाखाली पैसे उकळतात. अनेक पर्यटक कारवाईचा ससेमिरा मागे नको म्हणून आर्थिक तोडपाणी करत प्रकरण मिटवून निघून जातात. स्थानिक व्यावसायिकांनाही सदर अधिकारी व कर्मचारी त्रास देऊन त्यांच्याकडून हप्ता, मटन व दारूच्या पार्ट्या घेत असल्याची उघड चर्चा ऐकायला मिळते.पर्यटकांची होतेय लूटमारराजमाची किल्ला परिसरातही वन अधिकाºयांकडून पर्यटकांची सर्रास लूटमार केली जाते. लायन्स पॉइंट परिसरात अवैध धंदे करणारे व रात्री-अपरात्री हॉटेल चालविणाºयांकडून, तसेच पवना धरण परिसरात तंबू लावत व्यवसाय करणारे स्थानिक यांच्याकडून दरमहा हे अधिकारी हप्ता वसुली करीत असल्याचे बोलले जात आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत कडक कारवाईची भूमिका घेत हप्तेखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, तसेच नियमानुसार असलेल्या कार्यकाळानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची बदली करावी, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.जबाबदारीचा विसरवन जागांचे रक्षण करण्याची जबाबदारी खरे तर या वनपाल, वनरक्षक व शिपाई यांच्यावर असते. मात्र, स्वत:चे खिसे गरम करण्याच्या नादात ही मंडळी कर्तव्यापासून दूर जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निकम यांच्या अटकेने ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड