पिंपरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच ; पोलिसांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 16:55 IST2018-10-11T16:55:15+5:302018-10-11T16:55:38+5:30

पोलिसांना खबर दिली जात असल्याच्या संशयावरून मोटारींची तोडफोड करीत आरोपीनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. 

Vehicle crusher session begins in Pimpri; Challenge to police | पिंपरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच ; पोलिसांपुढे आव्हान

पिंपरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच ; पोलिसांपुढे आव्हान

पिंपरी: एका टोळक्याने चार वाहनांची तोडफोड केली. ही घटना रामनगर, चिंचवड येथे बुधवारी रात्री घडली. पोलिसांना खबर दिली जात असल्याच्या संशयावरून मोटारींची तोडफोड करीत आरोपीनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सागर झोंबाडे, अभिषेक घनघाव, सुप्रीम काळे, अजय बारस्कर, दीपक गिरी (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत.अमित प्रकाश बाबर (रा. मोहननगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
विद्यानगरच्या समोरील बाजूस काहीजण रस्त्यावर दारू पीत बसले असल्याची माहिती बुधवारी रात्री साडेनऊ वाजता  पोलिसांना मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहताच टोळक्याने तेथून पलायन केले. आजूबाजूला ट्रक उभे होते. त्या ट्रक चालकांनी पोलिसांना कळविले असावे, असा संशय आल्याने आरोपीनी चार वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. या प्रकरणी अधिक तपास निगडी पोलिस करत आहेत. 
..................
 

Web Title: Vehicle crusher session begins in Pimpri; Challenge to police