शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 07:17 IST

न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. हगवणे यांच्या वकिलांनी बुधवारी अजब युक्तिवाद केला

पिंपरी (पुणे) : वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्याबाबत वाईट बोलले गेले. आरोप करणारे सूज्ञ आहेत. त्यांनाही मुले-बाळे असतील, एखाद्याच्या मुलीवरती असे बोलणे योग्य आहे का, असा सवाल वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला. भावना व्यक्त करताना कस्पटे यांच्या अश्रूचा बांध फुटला.

न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. हगवणे यांच्या वकिलांनी बुधवारी अजब युक्तिवाद केला. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्यूनरसाठी कशाला छळ करू? वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरू होते. वैष्णवीची टेंडन्सी सुसाइडची होती, असे वकिल म्हणाले.

याबाबत बोलताना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे भावनिक झाले, म्हणाले, 'माझी मुलगी तर गेलीच आहे, मेल्यानंतर तिच्याबाबत असे वाईट बोलू नये. लेकराचे नाव बदनाम करू नका. विशेष सरकारी वकील राज्य सरकारने नेमला त्याबद्दल सरकारचे धन्यवाद. आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे, त्यांना जामीन मिळू नये. तिघांना कठोर शिक्षा व्हावी. मुलीला न्याय मिळावा.'

सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढला

हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र) जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप आहे. त्यातच गुरुवारी गृह विभागाने सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार काढला आहे.

फॉर्च्यूनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन 

अनिल कस्पटे म्हणाले, फॉर्च्यूनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी वादावादी केली. मला फॉर्च्यूनर नाही दिली, तर मी यांची हेक्टर पेटवून देईन, असे सांगण्यात आले गाडी दिली नाही तर लग्न मोडेन, अशी धमकी दिली होती. चांदीच्या ताटाची, सोन्याची मागणी केली होती.

वैष्णवीचा पती, सासू, नणंदला न्यायालयीन कोठडी 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि वैष्णवी यांचा पती शशांक हगवणे यांची न्यायालयाच्या आदेशानुसार १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या सुनावणीनंतर लता आणि करिष्मा यांनी जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीचा निर्णय ३१ मेला होणार आहे. 

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणे