Vaishnavi Hagwane case:संपूर्ण कुटुंबाला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे; वैष्णवीच्या आईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:27 IST2025-05-21T18:20:25+5:302025-05-21T18:27:31+5:30
- माझ्या लेकीचं बाळ कुठे आहे कुणाकडे आहे आम्हाला काहीच माहिती नाही. माझ्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे.

Vaishnavi Hagwane case:संपूर्ण कुटुंबाला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे; वैष्णवीच्या आईची मागणी
पुणे - खूप आनंदाने लग्न लावून दिलं होतं. बाळ झाल्याच्या नंतर माझी लेक खूप आनंदी होती, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी सासू आणि नणंदचे तिच्यासोबत खूप भांडण झाले. तिची नणंद करिश्मा तिला मारायची. तिच्यावर खोटेनाटे आळ लावले होते. दिराने ही त्रास दिला होता. सासरचे माझ्या लेकीला नेहमीच मानसिक त्रास द्यायचे. पैशांची मागणी करायचे. टोचून बोलायचे. त्यामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले. माझ्या लेकीचं बाळ कुठे आहे कुणाकडे आहे आम्हाला काहीच माहिती नाही. माझ्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. संपूर्ण कुटूंबाला जन्म ठेपेची शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी वैष्णवीच्या आईने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मेला दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन वैष्णवी हिच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.
वैष्णवीच्या वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे (५१, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी शनिवारी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तर आज माध्यमांशी बोलतांना वैष्णवी यांच्या कुटूंबियांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, माझी लेक वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉरच्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाचे दुस-या दिवसा पासुन शशांक व तिचे सासु सासरे यांनी घरातील किरकोळ कामाचे कारणात्सव वाद घालुन तिचे बरोबर भांडण करु लागले. याबाबत माझ्या लेकीने मला फोनव्दारे सांगितले होते. त्यावेळी मी वडील या नात्याने मुलीचा संसार टिकावा यासाठी मी माझे जावई व मुलगी यांना समज दिला. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी जावई यांची आई लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन माझे मुलीस त्रास देण्यास सुरुवात केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेवून वैष्णवीला तिच्या सासऱ्याच्या लोकांनी शारीरीक व मानसिक त्रास देणे चालू केले होते असेही सांगितले.