पिंपरी : चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून पुरवठा अधिकाऱ्यांनी ४०० सिलिंडर जप्त केले. पुरवठा अधिकारी गणेश सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सकाळी ११ वाजता, वाल्हेकरवाडी येथे भेट दिली. अनधिकृत पत्राशेडमध्ये विविध प्रकारचे २५० ते ३०० गॅस सिलेंडर आढळून आले, अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिल्लिंग होत असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची माहिती नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांना कळविली. त्यांनी तातडीने पथक घेऊन वाल्हेकरवाडी गाठली. घटनास्थळी जात गॅस साठा जप्त केला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले असून अग्निशामक दलाची एक १ गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच याप्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
वाल्हेकरवाडीत बेकायदा गॅस साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 13:12 IST
अनधिकृत पत्राशेडमध्ये विविध प्रकारचे २५० ते ३०० गॅस सिलेंडर आढळून आले
वाल्हेकरवाडीत बेकायदा गॅस साठा जप्त
ठळक मुद्देअत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिल्लिंग होत असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता