Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक कुठलीही मदत न करता फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:56 IST2022-02-23T14:55:51+5:302022-02-23T14:56:06+5:30
अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक कुठलीही मदत न करता फरार
पिंपरी : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. देहूगाव, विठ्ठलवाडी येथे सोमवारी (दि. २१) रात्री पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला. रेविकुमार सदयांडी (वय ४९), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिबू देवदास (वय ४२, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २२) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे दाजी रेविकुमार हे दुचाकीवरून चिखली ते देहूगाव असा प्रवास करीत होते. त्यावेळी देहूगाव, विठ्ठलवाडी येथे एका पेट्रोलपंपासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने रेविकुमार यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावरून पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे तपास करीत आहेत.