मोशी येथे एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 15:52 IST2021-01-09T15:51:05+5:302021-01-09T15:52:05+5:30

किरण अमराळे दुचाकीवरून पुणे - नाशिक महामार्गावरून बाणेरकडे जात होता.

Two-wheeler driver death in ST bus accident at moshi | मोशी येथे एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

मोशी येथे एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जय गणेश साम्राज्य चौक, मोशी येथे गुरूवारी (दि. ७) सकाळी नऊच्या सुमारास अपघात झाला.  किरण हनुमंत अमराळे (वय २४, रा. चाकण) असे या अपघातातमृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी चंद्रकांत नानाभाऊ अमराळे (वय ४३, रा. जाधववाडी, चिखली, मुळगाव दावडी, ता. खेड) यांनी भोसरी एमआयडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी बसचालक रमेश गोपीनाथ डमाळे (वय ४७, रा. साई खिंडी, पो. चिकणी, जि. अहमदनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण अमराळे दुचाकीवरून पुणे - नाशिक महामार्गावरून बाणेरकडे जात होता. त्यावेळी एसटी बसने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने किरण अमराळे याचा मृत्यू झाला.

Web Title: Two-wheeler driver death in ST bus accident at moshi