Two-wheeler dies after falling branch of tree on his head | झाडाची फांदी डाेक्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
झाडाची फांदी डाेक्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : झाडाची फांदी पडून दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. कस्तुरी मार्केट, चिंचवड येथे ९ डिसेंबर २०१९ रोजी हा अपघात झाला होता. याप्रकरणी शनिवार, दि. १८ जानेवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रमेश उत्तम कारंडे (वय ५०, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ धनशाम उत्तम कारंडे (वय ५३, रा. शिवतेज नगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष समितीच्या (उद्यान विभाग) सबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनशाम यांचे भाऊ रमेश कारंडे हे त्यांच्या दुचाकीवरून कस्तुरी मार्केटकडून थरमॅक्स चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी झाडाची फांदी पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. चिखली पोपीस तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler dies after falling branch of tree on his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.