पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर निगडीजवळ झालेल्या अपघातात दोघे ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:57 IST2020-02-01T16:57:29+5:302020-02-01T16:57:58+5:30

निगडीजवळ कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघात

Two person death in accident near Nigdi on Pune-Mumbai National Highway | पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर निगडीजवळ झालेल्या अपघातात दोघे ठार 

पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर निगडीजवळ झालेल्या अपघातात दोघे ठार 

देहूरोड :  पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निगडीजवळ कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले असून एक तरुण जखमी झाला आहे. जखमींवर निगडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
    सौदागर दशरथ लोंढे ( वय २७) , ऐश मोहम्मद खान (वय २३ दोघे  रा. मोरेवस्ती, चिखली ) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे असून ज्ञानेश्वर दत्तू कांबळे ( वय २६ , रा. मोरेवस्ती चिखली ) हा तरुण जखमी झाला असून त्यांच्यावर वेक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर निगडी येथील भक्ती -शक्ती चौकाजवळ उड्डाणपुलाचे काम चालू आहे. त्याठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरु असतानाही जवळ असणा?्या एका हॉटेलसमोर अज्ञात कंटेनरने दुचाकीला (एमएच १४ एचवाय ६८०) धडक दिली. दुचाकीवरील लोंढे व खान या दोघांचा अपघातात मृत्यू झाला असून कांबळे हा तरुण जखमी झाला आहे. दुचाकीला धडक देऊन कंटेनर निघून गेला आहे. दुस?्या हॉटेलच्या सीसीटीव्हीवरून सदर वाहनाचा क्रमांक शोधण्यात येत आहे.

Web Title: Two person death in accident near Nigdi on Pune-Mumbai National Highway