रागात का बघताे, अशी विचारणा करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 03:53 PM2019-04-07T15:53:52+5:302019-04-07T15:56:16+5:30

रागात का बघतो अशी विचारणा करणाऱ्या तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केली.

two beat a person who ask not to see in anger | रागात का बघताे, अशी विचारणा करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

रागात का बघताे, अशी विचारणा करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

Next

पिंपरी : रागात का बघतो अशी विचारणा करणाऱ्या तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना बावधन, विज्ञाननगर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. 

रितेश महादेव अडागळे, रोहित महादेव अडागळे (दोघे रा. संतकृपा चाळ, बावधन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रसाद दत्तात्रय फोके (वय १९, रा. गोकुळनगर पठार, स. नं. ५६, प्लॉट नं. २८, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विज्ञाननगर येथील प्रभात सोसायटी समोरील रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रसाद फोके हे त्यांच्या मित्रांसमवेत थांबले होते. त्यावेळी रितेश अडागळे हा प्रसाद यांच्याकडे रागात बघत होता. त्यावेळी प्रसाद यांनी ‘तु माझ्याकडे रागाने का बघतो’ अशी विचारणा रितेश याला केली. त्यावेळी रोहित अडागळे याने पाठीमागून येवून प्रसाद यांच्या हातावर व डोक्यात लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच चाकुने गालावर मारले. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: two beat a person who ask not to see in anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.