Pune Crime: शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक; तब्बल '८० हजारांचा' शस्त्रसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 17:17 IST2021-10-11T17:17:09+5:302021-10-11T17:17:17+5:30
अटक केलेल्या दोघांकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

Pune Crime: शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक; तब्बल '८० हजारांचा' शस्त्रसाठा जप्त
पिंपरी : बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. खंडणी विरोधी पथकाने रविवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हवालदार वस्ती, मोशी येथे ही कारवाई केली.
गौरव मच्छिन्द्र डोंगरे (वय २३, रा. बलुत आळी, चाकण), शंकर शिवाजी वाडेकर (वय ३०, रा. भांबोली, ता. खेड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार वस्ती मोशी येथे चौधरी ढाब्याजवळ दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लावून गौरव आणि शंकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, असा एकूण ८० हजार ४०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.