अश्विनी जाधव - केदारी
पुणे : पुण्याच्या हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलच्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं, आणि तेही चालकाने घडवून आणल्याने संताप व्यक्त होतोय. दिवाळीचा बोनस न दिल्याने आणि इतर कामेही सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे उघडकीस आले आहे.
हिंजवडीतील आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून चार जणांचा बळी गेल्याची घटना बुधवारी घडली होती. मात्र या अपघातानंतर हा घातपात असल्याचा समोर आला, जनार्दन हंबर्डीकर अस या चालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये बोनस न दिल्याने आणि वेतन कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली आहे, अशी माहिती उघड झाली. नियोजनबद्द कट रचून त्याने हा प्रकार केला असल्याचं समोर आलं मात्र या चालकाने कंपनीवर जे आरोप केले, ते कंपनी मालकाने फेटाळून लावले लावले आहेत.
व्युमा ग्राफिक्स कंपनीने पगार थकवला, म्हणून टेम्पो ट्रॅव्हल पेटवली अशी कबुली चालक जनार्दन हंबर्डीकरने दिली. मात्र आम्ही त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही. त्याला वेळच्या वेळी पगार देण्यात आला आहे. असा खुलासा मालक नितेन शाहने केलाय. परंतु केमिकल कंपनीतून बाहेर गेले कसे याबाबत कंपनी मालकांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हिंजवडीतील फेज 2 मधील व्योम ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन टेम्पो सकाळी पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाले होते. त्यावेळी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस अचानक आग लागली. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली. टेम्पो ट्रॅव्हलर चा चालक जनार्दन हंबर्डीकर यांनीच हे सर्व कृत्य घडवून आणल्याच उघडकीस आले. आरोपी चालकाने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच वारजे येथून काडीपेटी घेतली होती. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या, उडी मारली. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला. स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.